लॉकडाऊनच्या काळात सिने प्रोड्युसरसाठी ओटीटी हे नवं माध्यम फिल्म रिलीजसाठी मिळालं . या काळात गुलाबो सिताबो, दिल बिचारा, शकुंतला देवी यासारख्या सिनेमांना हक्काचं स्थान ओटीटीवर मिळालं आणि आता या सिनेमांच्या यशानंतर खाली पिली, सिरीअस मेन, लक्ष्मी बॉम्ब, हे चित्रपट देखील ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. तसंच महाराष्ट्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत सिनेमागृह उघडण्यास बंदी केली असली तरी केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरनंतर सिनेमाह़ॉल उघडण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे इतर राज्यातील सिनेमागृहांची दार नव्या फिल्मसाठी लवकरच उघडी होणार आहेत....
तसंच यात सिनेफॅन्ससाठी आनंदाची बाब म्हणजे अक्षय कुमारचा बहुचर्चित लक्ष्मी बॉम्बचा धमाका ओटीटीवर होणार आहे. जवळपास १२० कोटींच्या घरात या फिल्मसचे राईट्स ओटीटीवर विकले गेले असल्याची चर्चा आहे. जो सिनेमा आधी मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याची तयारी सुरू होती, तो आता कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘सिरीअस मॅन’ सिनेमादेखील ओटीटीवर पाहायाला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेमध्ये आहे. तसंच या सिनेमामध्ये संजय नार्वेकरनेदेखील काम केलं आहे....सिनेमांप्रमाणेच काही वेबसिरीजही ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत यात ‘मिर्झापूर २’ आणि ‘द फॅमेली मॅन’ या वेबसिरीजचा समावेश आहे.…’मिर्झापूर २’ चं पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलंय. ‘मिर्झापूर’च्या यशानंतर आता या वेबसिरीजचा पुढचा पार्ट येतोय....वेबसिरीजचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. त्यामुले आजच्या जनरेशनला अपील होणारी कथा येथे पाहायला मिळते ....
तसंच येत्या काळात ‘फॅमेली मॅन’चा ‘चेहरा’ देखील ओटीटीवर दिसेल अशी मीडियामध्ये चर्चा आहे. या वेबसिरीजचा पहिला भाग हिट ठरला होता. त्यामुळे आता पुढच्या भागात काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे....
#FamilyMan #LaxmmiBomb #OTT #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber